एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

वाक्प्रचार

                       वाक्प्रचार 

1.  अद्दल घडवणे- शिक्षा करणे
2.  अनर्थ टळणे- मोठे संकट नाहीसे होणे
3.  आकांडतांडव करणे-  रागाने आदळआपट करणे
4.  आग्रह करणे- हट्ट धरणे
5.  अंग काढून घेणे- जबाबदारी टाळणे
6.  अंगाचा तिळपापड होणे- 
7.  आग लावणे- भांडण लावणे
8.  आकाश ठेंगणे होणे- खूप आनंद होणे
9.  अभिवादन करणे- नमस्कार करण
10. आडवे होणे- झोपी जाणे
11. इंगा दाखवणे- अद्दल घडवणे
12. इतिश्री होणे- शेवट होणे
13. इरेस पडणे- ईर्षा करणे
14. उखळ पांढरे होणे- खूप फायदा होणे 
15. उचलबांगडी करणे- जबरदस्तीने हलवणे
16. उन्मळून पडणे- मुळासकट कोसळले
17. उघडा पडणे- निराधार होणे 
18. उर दडपणे- भिती वाटणे
19. कंबर कसणे- हिंमत करून तयार होणे 
20. कुतूहल वाटणे- उत्सुकता वाटणे
21. कानाडोळा करणे- दुर्लक्ष करणे
22. कळी खुलणे- आनंदीत होणे 
23. कपाळाला हात लावणे- हताश होणे 
24.कात्रीत सापडणे-दोन्हीकडून अडचणीत येणे
25. कानोसा घेणे- अंदाज घेणे
26. कंठ दाटून येणे- रडू येणे
27. कणिक तिंबणे- मार देणे 
28. काळजाचे पाणी होणे- घाबरणे 
29. काया पालट होणे- संपूर्ण बदल होणे
30. कान फुटणे- ऐकू नाही येणे
31.कावरेबावरे होणे- भांबावून जाणे
32. खापर फोडणे- दोषी ठरवणे
33. खर्ची पडणे- कामी येणे
34. खो घालणे- विघ्न निर्माण करणे
35. खडा टाकून पाहणे- अंदाज घेणे
36. खस्ता खाणे- कष्ट करावे लागणे
37. खूणगाठ बांधणे- निश्चित करणे
38. खडसावून विचारणे- स्पष्टपणे विचारणे
39. खोड मोडणे- अद्दल घडवणे
40. गळा काढणे- मोठ्याने रडणे
41. गंध नसणे- कसलीच माहिती नसणे
42. गहिवरून जाणे- गलबलून जाणे
43. गर्क होणे- रंगून जाणे
44. गयावया करणे- दिनवाणी प्रार्थना करणे
45. गय करणे- क्षमा करणे
46. गळी उतरणे- पक्के मनात ठसणे
47. गळ्यात गळे घालणे- खूप मैत्री करणे
48. ग्रहण सुटणे- काळजी नाहीशी होणे
49. गट्टी जमणे- मैत्री होणे 
50. घाम जिरवणे- कष्ट करणे
51. घटका भरणे- शेवट जवळ येणे
52. घर डोक्यावर घेणे - दंगा करणे
53. घरोबा असणे- जिव्हाळ्याचे संबंध असणे
54. चेहरा पडणे- लाज वाटणे
55. चीज होणे- कष्ट वाया नाही जाणे
56. चाहूल लागणे- अंदाज येणे
57. चौदावे रत्न दाखवणे- खूप मार देणे
58. चुटपूट लागणे- हुरहुर वाटणे
59. चंग बांधणे- निश्चित करणे
60. चाल करून येणे- हल्ला करणे
61. जीव भांड्यात पडणे- सुटकेची भावना निर्माण होणे
62. जीवावर बेतणे- प्राण संकटात येणे
63. जेरबंद करणे- अटक करणे
64. जाहीर करणे- सर्वांनाकळवणे
65. जगाचा निरोप घेणे- मरण पावणे
66. जीवाचे रान करणे- खूप कष्ट करणे
67. जीवाला तीळ तीळ तुटणे- हळहळणे
68. जिभेला हाड नसणे- वाट्टेल ते बोलणे
69. जीवाला की प्राण असणे- खूप आवडणे
70. झुंबड उडणे- गर्दी होणे
71. टाळाटाळ करणे- स्पष्टपणे नाही न म्हणने 
72. टेंभा मिरवणे- दिमाख दाखवणे
73. टक लावून पाहणे- एकसारखे रोखून पाहणे
74. टाहो फोडणे- मोठ्याने आकांत करणे
75. टोमणा मारणा- खोचक बोलणे
76. डाळ निविदा शिजणे- काम निविदा साधणे
77. डोळे उघडणे- शहाणपण येणे
78. डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे
79. डोळा लागणे- झोप येणे
80. डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे
81. डोळ्यात खूपणे- सहन न होणे
82. डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे
83. डोळे दिपणे- आनंदाने डोळे चमकणे
84. छाती फाटणे- घाबरणे
85. तमा नसणे- पर्वा नसणे
86. तोंड देणे प्रतिकार करणे
87. तोंडात शेण घालणे- निंदा करणे
88. तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे
89. तोंड सुख घेणे- वाट्टेल तसे बोलणे
90. तावडीतून सुटणे- कचाट्यातून सुटणे
91. तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे
92. तळपायाची आग मस्तकी जाणे- संतापणे
93. ताव मारणे- भरपूर खाणे
94. तिळपापड होणे- क्रोधीत होणे
95. थोबाड रंगवणे- थोबाडीत मारणे
96. थैमान घालणे- धिंगाणा घालणे
97. दुर्लक्ष करणे- लक्ष नासिक देणे
98. दाताच्या कण्या करणे- विनंती करणे
99. दुधात साखर पडणे- अधिक चांगले घडणे
100. दात ओठ खाणे- चिड व्यक्त करणे
101. दुवा देणे- भले चिंतणे
102. धाबे दणाणणे- खूप घाबरणे
103. धडकी भरणे- खूप भिती वाटणे
104. धूळ चारणे- पराभव करणे
105. धूम ठोकणे- पळून जाणे
106. धुळीस मिळणे- नाश होणे
107. धारातीर्थी पडणे- वीरमरण येणे
108. नाडी सापडणे- अंदाज येणे
109. नाक घासणे- शरण जाणे
110. नाक मुरडणे- नापसंती दाखवणे
111. नकार देणे- मनाई करणे
112. नजरेत भरणे- आवडणे
113. नाक ठेचणे- खोड मोडणे
114. नाकी नऊ येणे- दमणे
115. नजर टाकणे- पाहणे
116. पाणी पडणे- वाया जाणे
117. पाठीशी घालणे- संरक्षण देणे
118. पोटाशी धरणे- माया करणे
119. पायपीट करणे- कष्ट करणे
120. पारा चढणे- संताप येणे
121. पाढा फिरवणे- दुर्लक्ष करणे
122. पाठ थोपटणे- शाबासकी देणे
123. पोटात कावळे ओरडणे- खूप भूक लागणे
124. पाणी पाजणे- पराजित करणे
125. पादाक्रांत करणे- जिंकणे
126. पराचा कावळा करणे- अतिशयोक्ती करणे
127. पित्त खवळणे- राग येणे
128. पसार होणे- गायब होणे
129. फडशा पाडणे- खाऊन टाकणे
130. फरार होणे- पळून जाणे
131. फत्ते होणे- विजयी होणे 
132. बोबडी वळणे- भितीने बोलता नाही येणे
133. बस्तान बसवणे- स्थिर होणे 
134. भान हरपणे- तल्लीन होणे
135. भीक नाही घालणे- नाही जुमाणने
136. भंडावून सोडणे- त्रासून सोडणे
137. मुठीत असणे- ताब्यात असणे
138. मामा बनविणे- फसविणे
139. मुभा असणे- परवानगी असणे
140. राम नसणे- अर्थ नसणे
141. रक्ताचे पाणी करणे- खूप कष्ट करणे
142. वचन देणे- शब्द  देणे
143. विडा उचलणे- प्रतिज्ञा करणे
144. वचपा काढणे-भरपाई करणे
145. वाकुल्या दाखवणे-चिडवणे
146. शोभा होणे- नाचक्की होणे
147. साखर पेरणे- गोड गोड बोलणे 
148. सोने होणे- चांगले होणे
149. सैरावैरा पळणे- वाट मिळेल तिकडे पळणे
150. हस्तगत करणे- ताब्यात घेणे
151. हात देणे- मदत करणे
152. हातपाय गाळणे- निराश होणे
153. हातावर तुरी देणे- निसटून जाणे
154. हात पसरणे- भीक मागणे
155. हाडाची काडे करणे- कष्ट करणे
156. हाडे खिळखिळी करणे- खूप मार देणे 
157. हात झटकणे- नामानिराळे होणे
158. हात टेकणे- सर्व प्रयत्न करून थकणे
159. दोनहात करणे- टक्कर देणे
160. ह्रदय भरून येणे- गहिवरून येणे
161. हुज्जत घालणे- उगाच वाद घालणे
162. होळी करणे- नाश करणे 
163. हाय खाणे- धास्ती घेणे
















2 comments:

  1. खूप छान
    सुंदर

    ReplyDelete
  2. खूप छान
    सुंदर




    चौवाटा पांगणे याचा अर्थ

    ReplyDelete