एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

बोधकथा



📝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         🎀 *हत्तीची सभा*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
          *आपल्या समाजाच्या हिताविषयी* नेहमी झटणार्‍या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बर्‍याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबुतर, विश्वासू कुत्रा, आज्ञाधारक उंट, निरुपद्रवी मेंढी व लहानशी उद्योगी मुंगी यांनी ते भाषण लक्षपूर्वक ऐकले. नेहमी कामात असलेल्या मधमाशीलादेखील ते भाषण आवडले, पण श्रोत्यांपैकी दुसर्‍या काहीजणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मुळीच आवडले नाही. उदा. वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला. साप आपल्या सर्व शक्तीनिशी फुसफुसू लागला व गांधील माशी व साधी माशी यांनी फार कुरकूर केली. टोळ तुच्छतेने सभेतून टुणटूण उडत निघून गेला. आळशी अजगराला राग आला व उद्धट वानराने तर तुच्छतेने वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली. हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खालील शब्दात संपवला, 'माझा उपदेश सर्वांना सारखाच उद्देशून आहे. पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग आला ते आपला अपराध कबूल करताहेत. निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकताहेत.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला फारसे आवडत नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 
*प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले*.
   *त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं*
    *या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला.दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यानी विचारले. कामात काही अडचणी आल्या तर नाही ना?*
      *पहिला  अभिमानाने म्हणाला, "आईला ताप होता. वडील पोटदुखीनं हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता; पण माझी साधना मी सोडली नाही. व हे रसायन तयार करून आणलं आहे. "दुसरा म्हणाला, "आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धन होता. बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. त्यामुळे आपण दिलेलं काम मी पूर्ण करु शकलो नाही.कृपया आणखी दोन दिवसांची सवड द्यावी.*"
          *आचार्यांनी आपल्या सहाय्यक  म्हणून त्याचीच निवड केली.*

 *तात्पर्यः ज्ञान असून ते जर योग्य वेळेला उपयोगात नाही आणले तर त्याचा काय उपयोग. समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?*
*-----📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝
         🎀 *माणुस व उंदीर*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
          *लोकांचे धान्य दळून देणार्‍या एका माणसाने* एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला.
              त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे, कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,'
          हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्‍यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

──━═▣ *बोधकथा*🔻▣═━━──
एक तरुण माणूस फार छांदिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्‍यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही; असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली, तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्‍चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, ‘अरे, मी तुझ्यावर विश्‍वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास. *तात्पर्य*-व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान राहत नाही.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝


         🎀 *रानटी व गावठी हंस*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
           *एका कुंपणात काही हंस पाळले होते.*त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले.
           जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे. त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले.  
            एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले. ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

         🎀 *कबुतर आणि मुंगळा*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
            *एका मुंगळ्याला फार तहान लागली* म्हणून तो पाणी पिण्यासाठी एका ओढ्यावर गेला असता पाण्यात पडून वाहू लागला. ती त्याची स्थिती एका कबुतराने पाहिली, तेव्हा त्याची दया येऊन त्याने आपल्या चोचीने एक झाडाचे पान तोडून ते पाण्यात टाकले व त्याच्या आधाराने मुंगळा सुरक्षितपणे कडेला आला. पुढे काही दिवस गेल्यावर एके दिवशी कबुतराला पकडण्यासाठी एक पारधी जाळे घालू लागला. त्यावेळी मुंगळा जवळच होता. तो प्रकार पाहताच हळूच जाऊन त्याने पारध्याच्या पायाचा चावा घेतला. त्या वेदनेने त्याने एकदम हातपाय झाडले, त्याचा आवाज ऐकून कबुतर सावध झाले आणि उडून गेले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🎀तात्पर्य:-माणसाने उपकार करीत असावे म्हणजे प्रसंगी एखादा क्षुल्लक माणूसही ते उपकार स्मरून उपकारकर्त्यास मोठ्या संकटातून सोडवील.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



         🎀 *शेतकरी व बैल*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
           *एका शेतकर्‍याचा बैल* त्याच्या शेतातून हरवला म्हणून त्याने आपल्या नोकराला त्याला शोधायला पाठविले. त्या मूर्ख नोकराने त्याचा पाठलाग करत शेवटी त्याला एका अरण्यात गाठले. वाटेत रस्त्यावरून तीन पक्षी उडत गेले. त्यांच्यामागून तो नोकरही धावत गेला. त्याला तिकडे इतका वेळ लागला की मालकाला त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले.
          मग तो स्वतः शेतात जाऊन पाहतो तो नोकर आकाशाकडे पाहात सारखा धावत सुटला आहे असे त्याला दिसले. म्हणून त्याला शेतकर्‍याने विचारले, 'काय रे, काय बातमी आहे?' नोकर म्हणाला, 'अहो, ते मिळाले का !' शेतकरी म्हणाला, 'अरे कोण?' तो मूर्ख नोकर म्हणाला, 'पहा हे तीन पक्षी येथे उडताहेत, पण मला काही ते पकडता येईनात.'

ते ऐकून शेतकर्‍याने त्याला चांगलाच मार दिला. आपले नेमून दिलेले काम सोडून भलत्या गोष्टीच्या नादी न लागण्याचे त्याला बजावले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *बरेच लोक क्षुल्लक गोष्टीच्या मागे लागून आपले कर्तव्य बजाविण्याचे सोडून देतात.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

         🎀 *बढाईखोर माणुस*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
            *एक माणूस फार वर्षे प्रवास करून* आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही.
           तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


         🎀 *शेतकरी व साप*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
          *एका शेतकर्‍याने थंडीचे दिवस* असताना कुंपणाजवळ पडलेला एक साप पाहिला. तो थंडीमुळे अगदी मरायला टेकला होता. ते पाहून शेतकर्‍याला त्याची दया आली. म्हणून त्याने त्या सापाला घरी नेऊन विस्तवाजवळ ठेवले.
           तेथे थोडी ऊब मिळताच सापाला हुशारी आली व तो मोठमोठ्याने फूत्कार करून शेतकर्‍याच्या बायकापोरांच्या अंगावर उड्या मारू लागला. त्या वेळी शेतकर्‍याची बायकापोरे जोराने ओरडू लागली. तो ओरडा ऐकून शेतकरी हातात कुर्‍हाड घेउन आला व एकाच घावात त्याने सापाचे दोन तुकडे केले. त्यावेळी तो सापाला म्हणाला, 'अरे दुष्टा ज्याने तुझा प्राण वाचवला त्याचे उपकार असे फेडतोस काय ? ह्या तुझ्या कृतघ्नपणाला मरणापेक्षा काहीतरी कडक शिक्षा असायला हवी होती.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *कित्येकजण स्वभावतः इतके दुष्ट असतात की, ज्यांच्या कृपेने त्यांना श्रीमंती व शक्ती प्राप्त होते त्यांच्याच जीवावर उठून वेळ पडल्यास त्यांचा नाश करण्यासही ते कमी करीत नाहीत.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

        🎀 *कस्तुरी मृग*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एकदा एका कस्तुरी मृगाची शिकार* करण्याकरिता काही शिकारी लोक व त्यांचे कुत्रे यांनी त्याचा पाठलाग केला असता ते हरिण पळता पळता दमले व जीव आता कसा काय वाचवावा याच्या काळजीत पडले.
           तेवढ्यात त्याला सुचले की, हे शिकारी लोक आपल्याजवळ कस्तुरीसाठी मागे लागले आहेत. तेव्हा कस्तुरी जर आपण काढून टाकली तर ते शिकारी आपल्यामागे लागणार नाहीत. म्हणून त्याने आपल्याजवळील कस्तुरी टाकून दिली व ती घेऊन त्याच्या जीवास अपाय न करता ते शिकारी तेथून निघून गेले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य*:- *ज्यामुळे दुष्ट लोकांचा त्रास वरचेवर होतो, ते कितीही मुल्यवान असले तरी शहाणी माणसे त्याचा त्याग करून स्वतःचा जीव वाचवू शकतात.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝




         🎀 *एक डोळा असलेले हरिण*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एका हरिणाचा एक डोळा फुटला* म्हणून ते नेहमी समुद्राकाठी चरत असे. समुद्राच्या बाजूने आपणास भिती नाही तेव्हा फुटका डोळा समुद्राकडे व धडका जमिनीकडे केला म्हणजे जमिनीवरून येणार्‍या शत्रूपासून आपला बचाव करता येईल असे त्याला वाटे.
           त्या हरणाची शिकार करण्यास एक शिकारी फार दिवस टपला होता. पण जमिनीच्या बाजूने त्याचा काही उपाय चालेना. मग तो होडीत बसून समुद्रातून हरणाजवळ आला व त्यावर गोळी झाडून त्याने त्याचा प्राण घेतला.
           प्राण जातेवेळी हरिण मनाशीच म्हणाले, 'अरे, काय हे दुर्दैव ! तुझी करणी विचित्र व अगम्य आहे. जिकडून मला धोका पोहचण्याची शक्यता होती तिकडून तो न पोचता मला सुरक्षित वाटणार्‍या बाजूनेच तो पोचला. खरच हा दैवयोग विचित्र आहे.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *आपण ज्याला मोठे विश्वासू समजतो, तेच प्रसंगी आपला नाश करण्यास प्रवृत्त होतात व जे आपणाला अविश्वासू वाटतात तेच प्रसंगी आपल्या उपयोगी पडतात, असे कधी कधी घडते.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

         🎀 *सिंह व इतर पशु*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*जंगलचा राजा सिंह व इतर पशू* यांची एकत्र अशी एके दिवशी एक सभा भरली.
या सभेत सिंह व इतर पशू यात एक करार झाला. सर्वांना एक विचाराने चालावे व जे काही मिळेल ते सारखे वाटून घ्यावे असे ठरले.एके दिवशी सिंह, कोल्हा, लांडगा व तरस या चौघांनी मिळून एक हरिण मारले व त्याचे कोल्ह्याने चार सारखे वाटे केले. त्यावेळी सिंह पुढे होऊन त्यातील एका वाट्याकडे बोट दाखवून म्हणाला, 'अरे, हा माझा वाटा मी कर म्हणून घेणार, दुसराही वाटा माझाच, कारण तुम्ही जो पराक्रम केलात तो सर्व माझ्या बळावरच नाही का ?'मग तिसर्‍या भागाकडे पाहून व मान हलवून सिंह पुढे म्हणाला, 'ज्या अर्थी तुम्ही माझी प्रजा व मी तुमची राजा आहे, त्या अर्थी तुम्ही हा वाटा मला भक्तीने अर्पण करालच म्हणजे तोही माझाच व चौथा तर माझाच वाटा.'पुढे आपले प्रजेविषयीचे प्रेम व्यक्त करीत व राजेपण दाखविण्यासाठी सिंह म्हणाला, 'परंतु हा चौथा वाटा मी जतन करून ठेवणार आहे कारण सैन्यासाठी अन्नसामग्री अशी नाही व ती असणं आवश्यक आहे. अडचणीच्या वेळी ती उपयोगी पडेल. पुढे येणार्‍या अडचणीची आधी सोय करणं ही राजनीतीला धरून आहे, नाही का ? मी काय म्हणतो ते समजलं असेलच अन् ते जर तुम्हाला मान्य असेलच अन् ते जर तुम्हाला मान्य नसेल तर त्यात तुमचाच नाश आहे.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🎀 *तात्पर्य*:- *दुर्बल व शक्तिमान यांची एकी फार दिवस टिकणे शक्य नाही. कारण एकत्र येताना बलवान लोक ज्या शपथा घेतात त्या शक्तीच्या जोरावर मोडूसुद्धा शकतात. अशा वेळी दुर्बलांनी त्यांच्याशी संबंध ठेवणेच वेडेपणाचे होय.*

       ♦ *नदी,झाड,वारा*♦
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*नदीच्या काठी मोठे झाड होते*ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले.
            वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्‍याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्‍याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय.
           बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्‍यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : -  *समर्थापुढे दुर्बलाने नम्रतेने मागावे, कसे न करता जे उद्दामपने लागतात ते ब-याचवेळा स्वताःचा नाश करुन घेतात.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
──━═▣ *बोधकथा*🔻▣═━━──
*कुरापतीऊंदीर*-एका ठिकाणी एक मोठा हत्ती शांतपणे  बसलेला असतो, तेवढयात एक कुरापती ऊंदराला हत्तीला चिडवायची हुक्की येते, तो आपल्या बिळातुन येऊन तो हत्तीला त्रास देवू लागतो, सुरवातीला हत्ती दुर्लक्ष  करतो, पण नंतर ऊंदराला मजा येवू  लागते, हत्तीला त्रास देण्यात, हत्ती जागेवरुन ऊठतो आणी ऊंदराला मारण्या साठी त्याच्या  बिळाच्या दिशेने आपल्या डोक्याने टक्कर मारू लागतो, ऊंदीर आत  असल्याने ऊंदराला काहीच फरक पडत नाही, तो परत दुसरी कडुन त्रास  देत राहतो, कारण ऊंदराला पक्क माहीत होतं की हा हत्ती प्रचंड ताकदवर आहे, तसाच त्याचा टराग ही प्रचंड आहे, पण तरीही तो आपणास हरवु शकत नाही, कारण त्याचा राग आणि  अतिऊत्साहीपणाच त्याला नडेल, जितका ऊंदीर त्रास देऊ लागला, तितका हत्तीचा राग अजुन वाढु लागला ,आणि आपण कुणाशी  भांडतो कशासाठी भांडतोय , हे  हत्तीच्या लक्षात आले नाही, शिवाय ऊंदराचे तर कामच आहे कुरापतीं  करणे, आपण तिकडे लक्ष न देता  त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण  ऊंदराला हरवु शकतो हेही हत्ती  विसरला, ऊंदीर आपल्याला आपल्या  ऊद्देशापासुन लांब नेतोय हे पण  हत्तीच्या ध्यानातच येत  नसते, आणि शेवटी इतक्या मोठया बलाढ्य  हत्तीने ,ऊंदराच्या फालतु गोष्टीमुळे, आपले डोके आपटुन आपटून आपला जीव गमावला.आता यात ऊंदराचे काही नुकसान झाले  का ? नाही, उलटे  ऊंदराने चांगले स्वतःचे मनोरंजन करून घेतले, वरून एका बलाढ्य हत्तीला हरविण्याचे श्रेय आणि आनंद मिळवला. हत्तीला त्याच्या ताकदीच्या गर्वाने टझुकवलं आणी बुद्धीने काम करणं थांबवलं.जर  वेळीच त्याने विचार केला असता , आणि त्याप्रमाणे वागला असता, तर  असं कोणीही त्याची ताकद आणी  रागाचा गैरफायदा घेतला नसता.
*तात्पर्य*-समाजात पण ?असच  होत असतं. एकदा का कळालं की  आपण गरम डोक्याचे आहोत आणी  रागा मध्ये भान विसरून जातो, तेव्हा छोटा ऊंदीर ही आपला नाश करु  शकतो, शांत राहा आणि चांगला निर्णय घ्या, आपल्या जीवनात विजयी व्हा.
──┅━━═▣🔻▣═━━┅──

📝
──━═▣ *बोधकथा*🔻▣═━━──
*कोकिळा, कावळा आणि घुबड*- कोकीळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, ‘घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा! माझी अंडी पूर्ण विश्‍वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्यांची रीत झाली?’ घुबड म्हणाले, ‘अगं कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस त्याअर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य. *तात्पर्य*-दुसर्‍याला उपदेश करून पांडित्य दाखविण्यापेक्षा प्रथम आपली वागणूक सुधारावी.
──┅━━═▣🔻▣═━━┅──

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
 
       ♦ *नदी,झाड,वारा*♦
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*नदीच्या काठी मोठे झाड होते*ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले.
            वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्‍याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्‍याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय.
           बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्‍यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : -  *समर्थापुढे दुर्बलाने नम्रतेने मागावे, कसे न करता जे उद्दामपने लागतात ते ब-याचवेळा स्वताःचा नाश करुन घेतात.*
             🌹🙏🙏🌹
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

1 comment: