●♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤●
●उपक्रमाचे नाव – श्रुतलेखन●
कार्यवाही –
१) हा उपक्रम इयत्ता पहिली ते चौथी च्या मुलांसाठी घेता येतो.२) या उपक्रमासाठी मुलांना मी दुरेघी वही घालण्यास सांगितली.वहिला कव्हर घालण्यास सांगितले.३) परीपाठानंतर चौथीच्या मुलांना दररोज १० शब्द सांगितले जातात.४) ते त्याच वेळी तपासले जातात.५) चुकलेला शब्द ५ वेळा लगेचच लिहिण्यास सांगितला जातो.६) १० पैकी १० शब्द बरोबर असणाऱ्या मुलांना स्टार दिला जातो (*)७) शब्द, वाक्य, उतारा, इंग्रजी शब्द, असा चढता क्रम ठेवला जातो.८) महिन्याच्या शेवटी ज्यास्त स्टार मिळवणाऱ्या मुलांना बक्षीस दिले जाते.
फलश्रुती –१) हस्ताक्षर सुधारण्यास मदत होते.२) लेखन कौशल्य विकसित होते.३) शुद्धलेखनाची सवय मुलांना लागते.४) १० शब्द बरोबर येणाऱ्या मुलांना स्टार दिला जातो त्यामुळे स्टार मिळवण्याची चुरस मुलांमध्ये वाढते.५) उपस्थिती वाढते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●उपक्रमाचे नाव- शब्द कमळ●
कार्यवाही- १) या उपक्रमासाठी पहिल्यांदा कार्डशिट पेपरपासून आकर्षक कमळ तयार करून घेतले.२) त्या कमळाच्या पाकळ्यांवर इयत्ता पाहिलीसाठी उपयोगि असणारे शब्द लिहिले.३) इयत्तेनुसार कमळाच्या पाकळ्यांवर आपण कोणताही मजकूर लिहू शकतो.४) इयत्ता पहिलीसाठी सुरवातीला मुळाक्षरे देखील लिहिता येतील.५) इंग्रजी शब्द लिहिता येतील.
फलश्रुती-१) शब्दसंपत्तीत वाढ होते.२) रंजकता.३) वाचन कौशल्याचा विकास.४) मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●उपक्रमाचे नाव- एक तास परिसरात●
कार्यवाही
इयत्ता पहिली व इयत्ता चौथीच्या मुलांना शाळेजवळच असलेल्या तुकाई मंदिराच्या परिसरात मुक्त वातावरणात चित्र काढणे व ज्ञानरचनावादावर आधारित उपक्रम- अक्षरांवर खडे ठेवणे यासाठी एक तास दिला... खरचं, त्यावेळी मुलांच्या चेहर्यावर मी पाहिलेला उत्साह आणि आनंद मला चार भिंतींमध्ये कधीच पाहता आला नाही...
फलश्रृती-
१) आनंददायी वातावरण निर्मीती.२) कृतीयुक्त अध्ययन अनुभव.३) मुक्त वातावरणात मिळणारे ज्ञान चिरकाल टिकणारे.४) परिसराशी जवळीकता.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●उपक्रमाचे नाव - शब्दांचा आकाशकंदील ●
कार्यवाही -
हा उपक्रम सर्व इयत्तांसाठी घेता येतो. या साठी पहिल्यांदा शब्दांचे आकाशकंदील तयार करून घ्यावेत. समान त्रीज्जेचे आठ वर्तुळ कार्डशीट पेपर पासून तयार करावेत. प्रत्येक वर्तुळावर समभूज त्रिकोण आखून घ्यावा. वर्तुळाच्या प्रत्येक कडेवर दुमडून घ्यावे. अशाप्रकारे आठ वर्तुळ आकाशकान्दिलाप्रमाणे एकमेकांना जोडून घ्यावेत. आता त्या त्या इयत्तेनुसार आकाशकांदिलावर मजकूर लिहावा.उदा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इंग्लिश वर्डस. हा आकाशकंदील जास्तीत ज्यास्त विध्यार्थ्यांना हाताळण्यास द्यावा.
फलश्रुती -
१) प्रत्यक्ष अनुभव विधार्थ्याना मिळतात.
२) साहित्य प्रत्यक्ष हाताळल्यामुळे मिळालेल्या ज्ञानाचे दृढीकरण होते.
३) गटपद्धतीत हे साहित्य खूपच परिणामकारक ठरते.
४) विध्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●उपक्रमाचे नाव - अंक लेखन सराव कार्ड ●
कार्यवाही -
या उपक्रमासाठी मी लमिनेशन केलेली अंक लेखन कार्ड वापरली आहेत. कार्डच्या एका बाजूला प्रिंटेड १ ते १०० अंक व दुसरया बाजूला १ ते १०० अंक लिहिण्यासाठी रिकाम्या चौकटी. इयत्ता पहिलीसाठी ही अंक लेखन कार्ड खूपच उपयुक्त आहेत. दररोज शाळेत आल्यानंतर पहिलीची मुलं ही कार्ड घेतात व १ ते १०० अंक वाचन करतात. वाचन झाल्यानंतर स्केचपेन घेवून रिकाम्या चौकटीत १ ते १०० अंक लिहिण्याचा सराव करतात. स्केचपेनने लिहिल्यामुळे लिहून झाल्यावर ते सहज पुसलं जातं. अशाप्रकारे पहिलीच्या मुलांचा अंक वाचन लेखन सराव खूप चांगल्या प्रकारे होतो.
फलश्रुती -
१) अंक वाचन लेखन सराव खूप चांगल्याप्रकारे होतो.
२) मुलं सहजतेने अंक शिकतात.
३) मुलं गुंतून राहतात.
४) रंगीत स्केचपेनने अंक लिहायला मिळतात, ही उत्सुकता आणि आवड मुलांमध्ये निर्माण होते.
५) अंकांचे स्ट्रोक चांगल्याप्रकारे समजतात.
६) नवनिर्मितीचा आनंद मुलांना मिळतो.
७) रंगांबद्दल मुलांना असणारया आवडीचा उपयोग अंक शिकण्यासाठी करता येतो.
*मुलांना जमिनीवर बसल्यानंतर त्यांचे हात कधीच स्थिर नसतात...ते नेहमी जमिनीवरील मातीत रेषा ओढत राहतात, काहीतरी काढत राहतात...* *आणि ही त्यांची सहजप्रवृत्ती असते.**मुलांच्या याच सहजप्रवृत्तीचा उपयोग अंकांच्या दृढीकरणासाठी करून घेण्याचे ठरवले...आणि काय गंमत १ ते १० अंक जमिनीवर कोरून बसले की सर्व जण गिरवत, अगदी आनंदाने आणि अमाप उत्साहाने....
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
⚫️उपक्रमाचे नाव - टोपीमध्ये दडलंय कोण
*●माझा ज्ञानरचनावादी उपक्रम●*
*⚜उपक्रमाचे नाव- टोपीमध्ये दडलय कोण?*
*⚜इयत्ता- पहिली*
*⚜कार्यवाही- सदर उपक्रमासाठी मी अ पासून ज्ञ पर्यंतच्या मूळाक्षरांच्या चिठ्ठ्या तयार करून घेतल्या. त्या सर्व चिठ्ठ्या एका कागदी टोपीत ठेवल्या. पहिलीच्या एकेका मुलाला पुढे बोलावून त्या टोळीतील एक चिठ्ठी उचलून त्यावरील मुळाक्षर ओळखायला सांगितले. व त्याच मुळाक्षरावरून एक शब्द सांगण्यास सांगितला...*
*⚜फलनिष्पत्ती-**☝आनंददायी वातावरणात मुळाक्षरांचे दृढिकरण झाले.**☝मुलांमध्ये सभाधिटपणा वाढला**☝मुले स्वानुभवातून वेगवेगळी शब्द सांगू लागली**☝मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.**☝सर्व विषयांसाठी सर्व वर्गांसाठी हा उपक्रम घेता येतो.
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
🍭उपक्रमाचे नाव- इयत्ता पहिली संपूर्ण तयारी🍭
● कार्यवाही ●
या उपक्रमासाठी प्रथम काना शब्द ते अनुस्वार शब्द, सोपी वाक्ये, उतारा यांच्या झेरॉक्स काढून घ्याव्यात. आपल्या शाळेत काही वर्षांपूर्वी आलेली स्वाध्याय कार्डे घेवेन त्यावर या झेरॉक्स च्या प्रति चिकटवून घ्याव्यात. छोट्या मापाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये ही कार्डे एकेक करून घालून घ्यावीत. आता आपली कार्डे वाचनासाठी तयार आहेत.
● फायदा ●
१ ] मुलांना साहित्य हाताळायला मिळेते. त्यामुळे त्यांचा शिकण्याचा उत्साह वेगळा असतो.२] गटपद्धतीत ही कार्ड दिल्याने अप्रगत मुलंही मन लावून वाचन करतात.३] स्वकृतीतून मुलांना वेगळा आनंद मिळतो. शाळेविषयी ओढ निर्माण होते.४] आनंददायी वातावरण निर्माण होऊन मुल शाळेत रमते.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
* उपक्रमाचे नाव - गटपद्धती *
*कार्यवाही*
द्वीशिक्षकी शाळेमध्ये हा उपक्रम आतिशय उपयुक्त आणि परिणामकारक आहे. बऱ्याच वेळेस एका शिक्षकाला या ना त्या कारणाने शाळेबाहेर राहावे लागते अशा वेळेस शाळेतील एका शिक्षकावर चार वर्ग सांभाळण्याची जबाबदारी येते. त्यावेळी शाळेत गटपद्धती आपण वापरू शकतो. शाळेच्या मैदानावर चार वर्गांचे चार गट करून प्रत्येक वर्गास गोलाकार बसवावे. प्रत्येक वर्गास वाचन, लेखन, गणिती क्रिया, इंग्रजी यांचा अभ्यास द्यावा. आणि ज्या वर्गाला अध्यापन करावयाचे आहे त्या वर्गाला अध्यापन करावे.
*फायदे*
१) शिक्षकास चारही वर्गांवर सहजरीत्या नियंत्रण ठेवता येते.
२) गटात बसवल्यामुळे मुले दिलेला अभ्यास मन लावून करतात.
३) गट पद्धतीमुळे मुलांमध्ये सहकार्याची वृत्ती निर्माण होते.
३) मैदानावर गट केल्यामुळे मोकळ्या वातावरणात मुले आवडीने शिकतात.
४) गट पद्धतीमुळे दिलेला अभ्यास पूर्ण करण्याची चुरस मुलांमध्ये निर्माण होते.
*********************************************************************************
कार्यवाही -
* उपक्रमाचे नाव - नाट्यीकरण*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
* उपक्रमाचे नाव - तास आमच्या गप्पांचा! *
कार्यवाही -
दोन तिन मुलांचे गट करुन त्यांना मैदानावर थोड्या थोड्या अंतरावर बसवून घ्यावे. शक्यतो चार वाजल्यानंतर हा उपक्रम घ्यावा. मुलांना एकमेकांसोबत कोणत्याही आवडीच्या विषयावर मनसोक्त गप्पा मारण्यास सांगावे.
*फायदे*
1) मोकळ्या वातावरणात मुले फ्रेश होतात. 2) गप्पा मारणे हा मुलांचा आवडीचा विषय असल्याने मुलं शाळेत रमतात. शाळेविषयी जवळीकता निर्माण होते.3) एरवी वर्गात अबोल लाजरीबुजरी राहणारी मुलं दिलखुलासपणे बोलताना दिसली. 4) श्रवण व संभाषण कौशल्य एकाचवेळी विकसित होण्यास उपयुक्त उपक्रम.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
📚उपक्रमाचे नाव - आनंददायी शब्दनिर्मिती📚
कार्यवाही -
प्रथम वरील इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे कार्ड्स तयार करून घेतली. चार चार मुलांचे गट करुन प्रत्येक गटाला एक एक कार्ड दिले. आणि मुलांना शब्द तयार करण्यास सांगितले.
फायदा -
1)आनंददायी वातावरण निर्मिती होते. जी सहज अध्ययनास उपयुक्त ठरते. 2) शब्दांचे दृढीकरण होते, शब्दसंपत्तीत वाढ होते. 3) स्वनिर्मितीचा आनंद मुलांना मिळतो. 4) जिज्ञासू वृती निर्माण होते.
कार्यवाही - जून्या मासिकातील, पुस्तकातील चित्रे कट करुन ती जाड पुठ्ठयावर चिकटवून घेतली. मुलांचे गट करून प्रत्येक गटात एक चित्र कार्ड दिले. चित्र पाहून शब्द लिहा, वाक्य लिहा, गोष्ट लिहा अशा प्रकारचा सराव घेतला.
फायदा - 1) शब्दसंपत्तीत वाढ झाली . 2) मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली. 3) मुलं त्यांच्या भावना गोष्टीतून व्यक्त करू लागली, त्यामुळे मुल समजून घेण्यासाठी याचा जास्त फायदा झाला. 4) मुलांच्या विचारशक्तीला सुयोग्य दिशा मिळाली.
✳️❇️✳️❇️✳️❇️✳️❇️✳️❇️✳️❇️✳️❇️✳️❇️✳️❇️✳️
Great work madam
ReplyDeleteखूपच छान उपक्रम राबविण्यात येत आहे
ReplyDeleteखूपच छान उपक्रम राबविण्यात येत आहेत .अतिशय उपयुक्त ब्लॉग आहे.👌👌👌👌👌👌
ReplyDeleteसर्व उपक्रम एकदम भारी आहेत व नाविन्य देखील आहे.
ReplyDeleteNice
ReplyDelete