एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

स्वअभिव्यक्ती

स्व-अभिव्यक्ती

1)तुमच्या हातचे निरीक्षण करून तुमच्या हाताच्या सर्व बोटांचे उपयोग लिहा. 


2)इंद्रधनुष्याला पाहून तुम्हाला कोणकोणते प्रश्न पडतात? त्याची यादी करा.


3)तुमच्या गुरुजी/बाई यांच्यातील कोणकोणते गुण तुम्हाला आवडतात? अशा गुणांची यादी करा.


4)तुमच्या गुरुजी/बाई यांच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत? अशा गोष्टींची यादी करा.


5)खरे बोलण्याचे फायदे आणि तोटे यांची यादी करा.

6)तुमच्या मते कामचुकारपणा म्हणजे काय? तुम्ही कधी असा चुकारपणा केला आहे का? तेव्हा काय झाले?


7)पाऊस पडून गेल्यावर सगळीकडे चिखल होतो.अशा चिखलातून चालताना काय मजा येते?


8)तुम्हाला वर्गप्रमुख केले आहे असे समजून वर्गातील मुलामुलींनी कोणते नियम पाळावेत याची यादी करा.


9)तुम्हाला कधी कधी शाळा बुडवावी वाटते का? का ते लिहा. आणि वाटत नसेल तरी का ते लिहा.


10)मोठी माणसं तुमच्याशी कशी वागलेली तुम्हाला आवडत नाहीत? पाच गोष्टी लिहा.


11)तुम्हाला ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो अशा पाच गोष्टी लिहा.


12)तुम्हाला ज्या गोष्टींचा कंटाळा येतो अशा पाच गोष्टी लिहा.


13)तुमचा सर्वात ज्यास्त आवडता विषय कोणता?तुम्हाला तो का आवडतो ते लिहा.


14)तुमचा सर्वात ज्यास्त नावडता विषय कोणता?तुम्हाला तो का आवडत नाही ते लिहा.


15)चिंगी पावसात भिजताना थेंब झेलत होती पण पावसाचे पाणी तिला झेलता येत नव्हते.का घडत असेल असं तुम्हाला वाटत?


16)सहलीसाठी पैसे द्यायला वडील तयार नाहीत. तर तुम्ही काय कराल?


17)विज्ञानाची वही घरी विसरली आणि बाई खूप लिहून देत आहेत तर तुम्ही काय कराल?


18)आई जेव्हा खूप चिडते तेव्हा ती काय करते?ती शांत कशी होते?तुमचा अनुभव लिहा.


19)तुमच्या शिक्षकांना कधी राग येतो?पाच गोष्टींची यादी करा.


20)तुम्हाला केव्हा राग येतो?तेव्हा तुम्ही काय करता?




काल्पनिक लेखन 

1) मुंगी स्वतःविषयी माहिती सांगत आहे अशी कल्पना करून चार ते पाच ओळी लिहा.


2) घोड्याला पंख आले अशी कल्पना करून एक छोटी काल्पनिक गोष्ट तयार करा.


3) तुमची काही चूक नसताना तुम्हाला कोणी मारले रागावले तर तुम्हाला काय वाटेल?तुम्ही काय कराल?


4) भाकरी करताना काय काय करावे लागते? क्रमाने पाच वाक्य सांगा.


5) संतोष पहिल्यांदा शहरात गेला तेव्हा..............हा संदर्भ घेवून आठ ते दहा वाक्य सांगा लिहा.


6) फाटलेलंपुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्य लिहा.


7) आई घरी नाही आणि तुमच्या हातून दुध सांडले तर तुम्ही काय कराल?


8) तुमच्या मित्राने छोटी चोरी केली आहे.तुम्हाला ही गोष्ट माहित आहे.तर तुम्ही काय कराल?


9) तुमच्या मित्राचा डबा सांडला आहे तुम्ही काय कराल? 


10) पाऊस कमी झाल्याने उगवलेली रोपे सुकून गेली आहेत.हे समजल्यावर तुम्हाला काय वाटेल?

1 comment: