🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
♻ *३ शब्दांपासून कविता तयार करणे*♻
जीवन, धावपळ, हिंमत
*जीवन*
जीवन म्हणजे धावपळ
सदैव असते पळापळ
तारेवरची कसरत जणू
हिंमत ठेऊ जिद्दी बनू.
छंदाला थोडा वेळ देऊ
गप्पा मारू, मैत्री करू
हसू,खेळू, नाचू, गाऊ
जीवन आंनदमय बनवू
उद्या उगवेल की नाही
कोणाला माहीती नाही
भविष्याची नको चिंता
इथे चाले ईश्वरी सत्ता
🌹🙏🙏🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
( *गुळ,लाडु,कान.*)
*आपडी थापडी*
*गुळाची पापडी*
*धम्मक लाडू*
*तेल काढू !*
*तेलंगीचे एकच पान*
*दोन हाती धरले कान !*
*चाउ माउ चाउ माउ !*
*पितळीतले पाणी पिऊ*
*हंडा पाणी गडप !*
*गुळाची पापडी हडप !*
🌹🙏🙏🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻 *पाऊस, मोर, समुद्र*.
🌨पाऊस आलाय…
*~~~~~~~~~~~~~~~~~*
🌧पाऊस आलाय…भिजून घ्या ....
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
🌧आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
🌧आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
🌧आलाय पाऊस…..भिजून घ्या
🌹🙏🙏🌹
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
श्रावण,वाळवंट,तू
*बाळा*
तू नसताना सर्व भकास
जणू वाळवंटी उन्हाचा त्रास
सगळे जग वाटे उदास
तू असता फुले श्रावण मास
🌹🙏🙏🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*माया, आरती, पाणी*
गंगा
💦गंगेची निर्मळ माया
दाखवते वाहते जीवन
घांटाच्या काठावरती
कुणाचे पेटते सरण
😡राख भस्म लावलेला
उभा एक संन्यासी
गातो वंदन आरती
वार्यावर सोडून लेकरासी
😥दूरवरच्या प्रवाही लाटात
एक देहविकणारी वस्ती
विलीन होवून जाते
अांसवाच्या करुण भरतीत
नारायणाचे सोडले दार
किती तरी गंगानी
महादु:खाच्या उन्हाळ्यात
अाटले किती पाणी
🌹🙏🙏🌹
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
फुलपाखरु,रंग,निसर्ग
*फुलपाखरू*
फुलपाखरू किती स्वछंदी
आनंदी हसरे बाळ जणू
निरागसता असे पदोपदी
जादूमयी वाटे परी जणू
रंगांचा कुंचला फिरविला
निसर्गाने नाजूक हाताने
तेव्हाच कुठे उलगडला
पिसारा इंद्रधनू पंखाने
फुलांवरी बसे फूल बनुनी
सुंदरतेचा मी हेवा करी
दे थोडेेसे रंग तुझे मज
होईन मी ही रंगबावरी
🌹🙏🙏🌹
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*घर, शाळा ,शिक्षण*
*=====================*
🏠 *घर नाही नुसत्या खोल्या*
*घरात हव्या भावना ओल्या*
*घरात हवा जिव्हाळा*
*घर शिक्षणाची पहिली शाळा*
🏠 *घर नाही नुसता पसारा*
*घर नाही केवळ निवारा*,
*घराला असते कहाणी*
*घराला असतो आपला चेहरा*.
🌹🙏🙏🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*घर, शाळा ,शिक्षण*
*=====================*
चंद्र ,शाळा ,दप्तर
🌙एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा,
चंद्रावरच्या शाळेत नसेल खड़ू आणि फळा.
🌙छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले,
बटण दाबताच् शाळेचे दार होईल खुले.
🌙दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती,
आक्सीजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती.
🌹🙏🙏🌹
संकलन --वनिता मल्हारी मोरे
सदस्या राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समुहावरून
वनिता ताई आपला ब्लॉगमधील सर्व साहित्य , उपक्रम अप्रतिम आहेत
ReplyDeleteआपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा
सुदाम साळुंके सर - जुन्नर
समुह प्रमुख
Only उपक्रमशील शिक्षिका , राज्यस्तर कला संगीत समुह
प्रगत तंत्र स्नेही महाराष्ट्र
ONLY उपक्रमशील शिक्षिका समुहाकडून वनिताताई तुम्हाला
ReplyDeleteलाख लाख शुभेच्छा
Blog posts and creativity very good
ReplyDelete