सांस्कृतिक कार्यक्रम
सुत्र संचलन चारोळ्या
यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्त एकत्र संग्रहीत करुन आपणंसमोर देत आहे . . . .
नमस्कार 🙏
*🌹स्वागतम् ! सुस्वागतम्!! सहर्षस्वागतम्!!!*
*🙏
ॐनमो जी गणनायका । सर्वसिद्धी फलदायका । अज्ञानभ्रांती छेदिका।बोधरुपा।
*🙏
"नेसूनी शुभ्र वस्र असे विराजमान
आहे ती साक्षात लावण्याची खाण
शब्दात काय वर्णावे तिचे स्थान
अमृतरुपी कार्य,आहे तिचे विद्यादान"
*🙏
"पहिली भारतीय स्री शिक्षिका असे माझी सावित्रीआई
जिच्या अपार कष्टाने माझ्या हाती लेखनी येई
तिच्याच कृपाशिर्वादाने मी व्यासपीठावर सामर्थ्याने उभी राही
अश्या तेजस्वी क्रांतिज्योतिला अभिमानाने शत शत नमन मी वाही"
*🙏
आता वंदू श्रोते जन।भक्त ज्ञानी संत सज्जन।विरक्त योगी गुणसंपन्न।सत्यवादी।
*🙏आरंभ,प्रारंभ...करुया शुभारंभ*
आज शुक्रवार दि.30 डिसेंबर 2016
या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच..
"चातकाला आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षाऋतुची...
शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वातीनक्षत्राची....
अगदी तसेच
विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते तीच वार्षिक स्नेहसंमेलनाची..."
आणि या अश्या उत्साही कार्यक्रमात.. *मा. अध्यक्ष महोदय,सर्व प्रमुख पाहुणे..इतर मान्यवर...ग्रामस्थ मंडळ....पालक वर्ग...आजी,माजी सर्व विद्यार्थी...व सर्व बालचमु..* सगळ्यांचे शब्दसूमनांनी स्वागत..
*🙏
" उगवतो जसा पहाटेचा दिनकर
नवचैतन्य देवुनी फूलवितो चराचर
तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फूलावे होवुनी
गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन
(मान्यवरांना विनंती करून👆
*🙏
*🙏
मनोभावे झाले गणेशपूजन
प्रसन्न भावनेने केले दीपप्रज्वलन
उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन
उपस्थितांना वाहुया स्वागत सुमन....
नृत्य च्या आधी च्या चारोळ्या
1) मराठी शृंगाराचा काठोकाठ भरलेला चषक महणजे लावणी. ताल मृदुंगात रमलेले आपले मन ढोलकीचा ठेका ऐकला की, त्याच्याशी आपल्याही हृदयाचा ठोका नगतपणे जुळतोच. लावणी महणजे मराठी ऐश्वर्याची , मराठी खानदानाची, मराठी रसिकतेची, मराठी सौंदर्याची साक्षात बावन्नठणी प्रतिभाच. ढोलकीचा ताल आणि घुंघराचा बोल यांनी साकार झालेली लावणी ऐकुन कुणाचे मन हरकणार नाही. आपल्या नृत्याचा बहारदार आविष्कार सादर करण्यासाठी येत आहे ......
2) वंशाला दिवा पाहिजे म्हणून कितेक जण मुलगी नको म्हणतात पण आज परिस्थिती बदली आहे मुलानं पेक्षा प्रत्येक क्षेत्रात मुली शिकल्या आहेत पुढे आहेत वंशाला दिवा नाही तर खरी गरज पणती ची आहे जी दोन्ही घरी प्रकाश देते . देव भाग्यवान च्या च घरी जन्माला मुलगी घालतो कारण मुली सारखं प्रेम मुलगा करत नाही भाग्यवान आहेत ते लोक ज्याच्या घरी सरस्वती ,लक्ष्मी , पार्वती आहेत तेव्हा लेक वाचवा देश वाचवा मुलगा मुलगी एक समान देऊ दोघांना ही समान न्याय .
3) भारतातच्या सरहद वर आपल्या साठी जिवाची पर्वा न करता आपल्या भारत मायेच्या सेवेत रक्षणासाठी ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता आपण सुखाची झोप यावी या करता हे सैनिक लढत असतात आपल्या घरा पासून आपल्या गावा पासून हजारो कि.मी लांब असतात जेव्हा त्यांना आपल्या घरच्या च्या खुशाली चा संदेश येतो तेव्हा नकळतच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात अशा या महान सुपुत्राना मानाचा सलाम मानाचा सलाम ...असेच घेऊन येतं आहेत गीत संदेशे आते है हे गीत
4) दिवसेन दिवस पाऊस जरी साथ देत नसला तरी आपण हतबल न होता आलेल्या संकटाला सामोरे गेले आज जिवनाला कंटाळून जगाचा पोशिदा हतबल होवून आत्महत्या करतो पण आत्महत्या ने प्रश्न सूडत नाही वाढतात घरचे मुले बाळ उघड्यावर येतात ...तेव्हा घेऊन येतं आहेत आपल्या समोर नाटीका द्वारे असाच एक संदेश जहर खाऊ नका ......
5) जगाच्या पाठीवर एक मेव असा कृषीप्रधान देश आहे जिथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नादतात ऐक्यने राहातात विविध आपल्या धर्मानुसार मिळून सण साजरे केले जातात. ऐसा देश म्हणजे भारत देश ...याचं वर्णन पाहू या गीताच्या द्वारे ऐसा देश है मेरा ....
6) एक होता पेशवा नाव त्याचे बाजीराव
आटकेपार रोवुन झेंडा मराठ्याचे केले नाव
त्याची एक राणी नाव तिचे मस्तानी
रुपाने होती इतकी देखनी ,खालेले पान दिसे गर्दनी..
अशी आगळी वेगळी प्रेमकहानी...
चित्रपट आहे बाजीराव मस्तानी...
या एेतिहासिक चित्रपटातील मराठमोळी संस्कृती दाखविणारे गीत घेऊन येत आहेत..
7) मित्रानो ,
ज्या गीताने तरुणीचे मन बावरले,
ज्या गीताने तरुणांना याड लावले,
ज्या गीतािशवाय नव्हती दुसरी कुठलीच चर्चा
ज्या गीताने प्रत्येकजन समजु लागलेतत स्वत:ला आर्ची अन् परश्या
ज्या गीतावर तरूणासह म्हातारे ही नाचले करून थयथयाट
अहो तेच ते सैराटमधील झिंग झिंग झिगाट........
8) अख्या महाराष्ट्राला ज्या आरची परशाने सैराट केले आहे
ज्याच्या संगीतावर प्रत्येकजन फिदा आहे
चर्चा फक्त त्याचीच आहे
असा नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातील तुफान फेमस गाणे घेऊन येत आहेत
..........
झिंग झिंग झिंगाट💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻
😜😜😂😂
9) झिंग झिंग झिंगाट
आलय रंगात ।
भरलय मनात
झिंग झिंग झिंगाट ।।
10) 🌹गुलाबाची कळी
नमस्कार मंडळी 🙏🏻
कोणत्याही फुलाचं अवनी वरती येणं हे ईश्वराचं चमत्कारिक लेणं असतं! त्याचं सौंदर्य औंजळभरून घेणं म्हणजेच आनंदाचा आस्वाद घेणं होय.
अशाच प्रकारे प्रत्येक मुलीला कळी बनुन फुलावं लागतं. नि पिवळी हळद लावून सासर घरी सुगंध दरवळावा लागतो.
चला तर कळीचं फुलणं कसं असतं ते पाहु या पुढील नृत्य गीतातून!
सादर करते आहेत....
11) 🚣🏻♀मी हाय कोळी
नमस्कार मंडळी, 🙏🏻
आपल्या महाराष्ट्राला 720 कि मि लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. याच समुद्रावर कोकणचा कोळी बांधव अधिराज्य गाजवतो .त्या कोळी बांधवाचा मासेमारी करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय! याच समुद्रात मांदेळी, बोंबिल, कोलबी, बांगडा, वाव, सुरमा,खरखरा ,राणी मच्छी ,मुशी ,शार्क आणि पापलेट अशा प्रकारचे मासे पकडून तो आंतर राष्ट्रीय बाजार पेठ असलेल्या मुंबई नगरीत विकायला आणीत असतो ;अशावेळी कोळी बांधव नि त्याची पत्नी यांचयात होणारा नृत्य संवाद पाहु या पुढील नृत्यातून!
नृत्य गीताचे बोल $$$$$$$मी हाय कोली!
सादर करते आहेत......
12) 1. ज्या ढोलकीने पुरातन काळापासुन आपली परंपरा जोपासुन रसीकश्रोत्यांना मंत्र मुग्ध केले त्याच ढोलकीच्या तालावर जर एखाद्या कलाकाराने ठेका धरुन नाच केला तर ......
सादर करीत आहोत आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी हा ढोलकीच्या तालावरचा खास नजराणा फक्त आपल्या सारख्या रसीक श्रोत्यांसाठी.....,.
गीताचे बोल......
सादरकर्तीआहे/आहेत...
13) पिंगा ग पोरी पिंगा
चला जेजुरीला जाऊ
जय हो
कृष्ण सख्याची बाधा
मेरा juta है जपानी
गोंधळ मांडला
14)अप्सरा आली
कृष्ण जन्मला
घागरा रिमिक्स
देश रंगीला
कौन है वो
माय मराठी
तूच दुर्गा तू भवानी
बानू बया
15) सूर निरागस हो
काला चसमा
लिंबोणीच लिंबू लोकगीत
गण नायकाय
दिवाणी मस्तानी हो गयी
चुडी जो खन केगी हाथोमे
गुण गुण गुणा रे
16) ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या ह्रदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”......।
17) आनंदाचे पक्षी उडाले
खेळांचे मोर थुईथुई नाचू लागले
फुलपाखरे ही बागडू लागली
धुंदीत आनंदाच्या न्हाऊन
निघाली .....
18) चारोळी
सत्कार आपला करण्यास
हर्ष मज वाटतो ।
आनंदित झाल्या दाही दिशा
ह्दयी स्नेह दाटतो ।
🌹हरीची जना🌹
🙏🏼🖌🖌🖌🙏🏼
चारोळी
श्रीफाळ आणि पुष्प देऊनी
सन्मान आपुला केला ।
आपल्या येण्याने
हर्ष मनी झाला ।
🌹हरीची जना 🌹
सन्मानाचा तुरा आज
शिरपेचात तुमच्या
आदरभावाची शाल पांघरतो
जो मनात आहे आमच्या
चारोळी
किर्तीची ही शाल
आपण अंगी ओढावी ।
महती.आपली.अभिमाननने
आम्ही जगास सांगावी ।
🌹हरीची जना.
चारोळी
फेटा बांधूनी एकतेचा
व्यासपीठावर.आलात ।
मानवतेच्या धर्माचा
केंद्रबिंदु झालात ।
🌹हरीची जना 🌹
🎤🎤बक्षिस वितरणात उपयुक्त चारोळ्या🖌🖌🖌
मिळववलेत यश
बक्षिसास पात्र ।
कौतुक होई पहा
तुमचे सर्वत्र ।।
हे बक्षिस आहे
तुमच्या गुणवत्तेचे ।
मेहनत आणि जिद्द
तुमच्यातील हुशारीचे ।।
बक्षिस मिळवलेत
शाळेचा मान वाढला ।
आपल्या कलगुणांनी
शालेचा परिसर बहरला ।।
*🎤कार्यक्रमात टाळ्या मिळविण्यासाठी काही चारोळ्या/वाक्य---*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*1)महको तो ऐसे की,सारा बाग खिल जाए...ताली बजावो तो ऐसे की सभी बच्चे खुश हो जाए..*
*2) पाईनॕपलच्या रसाला ज्युस म्हणतात,जो टाळ्या वाजवीत नाही त्याला कंजुष म्हणतात...*
3)कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला
प्रेक्षकांच्या टाळयाशिवाय शोभा येत नाही कलाकारांच्या जातीला.
--------------------------------
सूर म्हणतात साथ द्या
दिवा म्हणतो वात द्या
आमच्या चिमुरड्याला
आपल्या टाळ्यांची साथ द्या
--------------------------------
कला सादर केल्यानंतर प्रेक्षकांची दाद मिळावी म्हणून हे आपण बोलू शकतो
4) वो ससुराल ही क्या जहाँ साली न हों।
और वो प्रोग्राम ही क्या जहाँ ताली न हो
5)आवाज ऐसे दो सोये हुए को होश आ जाये।
ताली ऎसे बजाओ सामने वालेको जोश आ जाये।
6)पेड़ पौधों को शोभा आती है हरीभरी डालियोंसे। प्रोग्राम को रौनक अति है जोशभरी तालियाओंसे।
7)नुसतच बरोबर चालल्याने ती सोबत होत नाही।
केवळ हाताला हात लागला म्हणून ती टाळी होत नाही।
चला हवा येऊ दया।
आणि जोरदार टाळ्या होउन जाऊ दया
8)कार्यक्रमासाठी केला आहे सगळ्यांनी साज ,
आहे कुठे टाळ्यांचा आवाज.
9)🌹फूल आहे गुलाबाचे;
जरा सुगंध घेत चला,
कार्यक्रम आहे लहानग्यानचा जरा टाळ्या देत चला.....जोरदार टाळ्यांचा गजर👏
10)सजली आहे मैफिल ,चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्ती साठी।
एकदा होउ द्या टाळ्यांचा गजर या बालकलाकारांच्या स्वागतासाठी.
11)दिवा म्हणतो वात दे हात म्हणतो साथ दे आणि रसिक प्रेक्षका तू टाळ्यांची दाद दे👏👏👏
12)शेतकरी म्हणतो, ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही.
या सुंदर कलाविष्कारासाठी टाळ्या का होत नाही...
13)रंगतदार कार्यक्रमाला बहारदार संगीताची जोड
आम्हा कलाकारांना फक्त तुमच्या टाळ्यांची ओढ
14) ही आपलीच बालके आहेत याचा न पडावा विसर
टाळ्या तर मोफतच आहेत
त्यात नको काटकसर ...
15)कला आहे ,कलेची जाण असणारा रसिक आहे,
या कार्यक्रमाची दाद देण्यास
आपल्या टाळ्यांचा आवाज आहे
☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*15 ऑगस्ट 26 जानेवारी* किंवा *सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल*
मराठी/हिंदी चारोळ्या...
*वंदनीय भारतमाता*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳
जिंदगी हर कदम, एक नई जंग है ।
*ज्याच्या स्वातंत्र्याची अमरकथा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलेली आहे असा तो भारत*...
🇮🇳 *आपल्या राष्ट्राप्रती प्रत्येक नागरीकाचं प्रेम कसं असावं*... *प्रत्येकांनी देशावर प्रेम करत कर्तव्य कशी पार पाडायची*?
*देशाचं रक्षण करणं हे फक्त सैनिकांचं काम नसून ते तुमचं आमचं सर्वांचं आहे*...
देशाचे रक्षण फक्त सैनिकच करू शकतात का ? आम्ही का नाही ? असा प्रश्न पडतो...
🇮🇳 *लहरोंसे डरकर नौका पार नही होती* ,
*कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती*।
🇮🇳 *झेलली छातीवर गोळी त्या विरांसाठी* ,
*दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी*,
*पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी* ,
*निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी* ,
*कोटी-कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी* ।।
🇮🇳 *इक्कीसवी सदी के देहलीज पे रखा है कदम*,
*दिल मे है कुछ सपने बस उसका हो करम*,
*तो मंजील अपनी पाकर दिखाऐंगे हम*,
*नया जहाँ बसायेंगे हम*,
*क्योंकी हम भी नही कुछ कम* ।।
🇮🇳 *खुषनशिब होते है वो लोग*,
*जो इस देश पे कुरबान होते है* ।
*जान दे के भी वो लोग अमर होते है* ।
*करते है सलाम ऊन देशप्रेमीयोंको* ,
*जिनके कारण इस तिरंगे का मान होता है* ।।
🇮🇳 *युनान, मिस्त्र, रोमाँ सब मीट गये जहां से* ,
*क्या बात है की हस्ती मिटती नही हमारी*..
*सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा*,
*सारे जहाँसे अच्छा हिंदुस्ताँ हमारा* ।।
🇮🇳 *कलम भिमजी की तलवारसे भी भारी थी* ।
*संविधान सौंपकर भिमजीने* ,
*ये दुनिया सवारी थी* ।
🇮🇳 *ये बात हवा को बताये रखना*,
*रोशनी होगी चिरागोंको जलाऐ रखना* ।
*लहु देकर जिसकी हिफाजत हमने की*..,
*ऐसे तिरंगे को सदा दिलमें बसायें रखना* ।।
🇮🇳 *कुछ नशा तिरंगे की आन का है* ।
*कुछ नशा मात्रभूमी की शान का है* ।
*हम लहराएंगे हर जगह तिरंगा*,
*नशा ये हिंदुस्तान की शान का है*..।।
🇮🇳 *भारतको जो काट सके ऐसी कोई समशेर नही* ।
*इतना खून बहेगा सरहदपर*, *जितना गंगामे नीर नही* ..।।
घर का झगडा बाजार में करो , ये कोई तरीका नही ..।
*कश्मिर किसका है ? हम बतायेंगे, अमेरिका नही*...।।
अब भी हुआ युद्ध तो , हमारा कुछ नुकसान ना होगा..।।
*मगर दुनिया के नक्शे पर फिर से पाकिस्तान ना होगा*..।।
*🎯बाल आनंद मेळावा सूत्रसंचालनासाठी--*
*🖊बांधुनी तोरण आनंदाचे*
*हा दिन असा साजरा व्हावा*
*बालकांचा जीव इथे रुळावा*
*तयांना आनंद आनंद मिळावा*
*🖊वैविध्य साधत खाद्य पदार्थांनी*
*तृप्ततेचा ढेकर इथे मिळावा*
*पंख लावुनी या आनंदाला*
*भरवू बालकांचा आनंद मेळावा*
*🖊गंमत जंमत करुनी सारे*
*हसतील नाचतील इथे बालक*
*दौलत राष्ट्राची ही रक्षिण्या*
*होवुया आपण सुज्ञ पालक*
*🖊नाचुया खेळुया बागडुया इथे*
*चित्रातही रंग भरुया इथे*
*धमाल मजा करुया इथे*
*नको ती भीती नको ते दडपण*
*फुलाप्रमाणे डोलुया,फुलुया इथे*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*✍🏻श्रीमती विजया पाटील
*सुंदर कविता*
*विझलो आज जरी मी,*
*हा माझा अंत नाही.....*
*पेटेन उद्या नव्याने,*
*हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll*
*छाटले जरी पंख माझे,*
*पुन्हा उडेन मी.*
*अडवू शकेल मला,*
*अजुन अशी भिंत नाही ..*
*माझी झोपडी जाळण्याचे,*
*केलेत कैक कावे..*
*जळेल झोपडी अशी,*
*आग ती ज्वलंत नाही..*
*रोखण्यास वाट माझी,*
*वादळे होती आतूर..*
*डोळ्यांत जरी गेली धूळ,*
*थांबण्यास उसंत नाही..*
*येतील वादळे, खेटेल तुफान,*
*तरी वाट चालतो..*
*अडथळ्यांना भिवून अडखळणे,*
*पावलांना पसंत नाही ....*
🍁🍁🍁🍁🍁🍁
*🎤लग्न समारंभाच्या सूत्रसंचालनात उपयुक्त चारोळी...*
लग्न सोहळा मांगल्याचा
दोन जीवांच्या मिलनाचा ।
येणार्या सुख.दुःखातुन
सुखी संसार मांडण्यचा ।।
लग्न म्हणजे रेशीमगाठ
दोन जीव एकत्र करण्याची ।
स्वप्न मनी सजलेली
लग्न बंधनात बांधण्याची ।।
लग्न म्हणजे सहजीवन
बंधन प्रेमाचे ।।
जीवलगाला खुप खुप
सुखात बघण्याचे
लग्न दोन कुटुंबांना
आणते एकत्र ।
साजरा करतो समाज
मान्य सर्वत्र ।।
लग्न म्हणजे दोन जीव
बांधले सप्तपदीने ।
सुरवात होते संसाराची
मधुर सहजीवनाने ।।
लग्नाचे बंधन
प्रितीचा संबंध ।
कायमचे निभवावे
दोघांनीही हे ऋणानुबंध ।।
लग्नाची बेडी
सहजीवनाची जोडी ।
सुखाची परीभाषा
प्रितीची गोडी ।।
✨✨✨✨✨✨✨✨✨
हर पतंग जानती है,
अंत में कचरे मे जाना है
लेकिन उसके पहले हमे,
आसमान छूकर दिखाना है ।
*" बस ज़िंदगी भी यही चाहती है "*
Nice information
ReplyDeletevery nice blog mam
ReplyDeleteखूप महत्वपुर्ण टिप्स आहे आपल्या उपयुक्त माहिती मुळे चालना मिळाली खूप धन्यवाद
ReplyDeleteVery nice information.
ReplyDeleteचांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तसेच चारोळी साठी विशेष आभार
ReplyDeleteअप्रतिमच कार्य💐💐
Deleteआपणासारखे शिक्षक देशातील सर्व शाळेत निर्माण व्होवोत!
असा ब्लॉग कसा तयार करायचा याबाबत आमच्या महाविद्यालयात कार्यशाळा तुम्ही घ्याल का?
प्रा.प्रल्हाद भोपे, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी. 9922794164
खूप उपयुक्त
ReplyDeleteछान ब्लॉग
ReplyDeleteउपयुक्त आहे
ReplyDeleteखुप छान अगदी उपयुक्त चारोळ्या आहेत
ReplyDelete