मराठी म्हणी
1. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
2. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
3. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
4. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
5. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
6. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
7. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
8. अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
9. अंधारात केले पण उजेडात आले.
10. अंधेर नगरी चौपट राजा.
11. अकिती आणि सणाची निचिती.
12. अक्कल खाती जमा.
13. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
14. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
15. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
16. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
17. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
18. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
19. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
20. अघळ पघळ वेशीला ओघळ.
21. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
22. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
23. अडली गाय खाते काय.
24. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
25. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
26. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
27. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
28. अती केला अनं मसनात गेला.
29. अती झालं अऩ हसू आलं.
30. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
31. अती तिथं माती.
32. अती परीचयात आवज्ञा.
33. अती राग भिक माग.
34. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
35. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
36. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
37. अपयश हे मरणाहून वोखटे.
38. अपापाचा माल गपापा.
39. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
40. अप्पा मारी गप्पा.
41. अर्धा वैद्या मरणास खाद्य.
42. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
43. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
44. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
45. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
46. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
47. अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
48. अळी मिळी गुपचिळी.
49. अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
50. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
51. असं कधी घडे अन सासुला जावई रडे.
52. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
53. असतील चाळ तर फिटतील काळ.
54. असतील मुली तर पेटतील चुली.
55. असतील शिते तर जमतील भूते.
56. असुन नसुन सारखा.
57. असून अडचण नसून खोळांबा.
58. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
59. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
60. असेल दाम तर होईल काम.
61. असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
62. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
63. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
64. आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
65. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
66. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
67. आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
68. आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
69. आईचा काळ, बायकोचा मवाळ.
70. आईची माया अन पोर जाईला वाया.
71. आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
72. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
73. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
74. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
75. आग लागल्यावर विहीर खणणे.
76. आगीशिवाय धूर दिसत नाही.
77. आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
78. आज अंबारी, उद्या झोळी धरी.
79. आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
80. आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
81. आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
82. आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
83. आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
84. आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
85. आधणातले रडतात, सुपातले हसतात.
86. आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
87. आधी करा मग भरा.
88. आधी करावे मग सांगावे.
89. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
90. आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
91. आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
92. आधी नमस्कार मग चमत्कार.
93. आधी पोटोबा, मग विठोबा.
94. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
95. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
96. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
97. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
98. आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
99. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
100. आपण आपल्याच सावलीला भितो.
101. आरे म्हटले की कारे आलेच.
102. आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
103. आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
104. आपण सुखी तर जग सुखी.
105. आपलंच घर, हागुन भर.
106. आपला आळी, कुत्रा बाळी.
107. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
108. आपला हात, जग्गन्नाथ.
109. आपलाच बोल, आपलाच ढोल.
110. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
111. आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
112. आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
113. आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
114. आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
115. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
116. आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
117. आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.
118. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
119. आपल्या कानी सात बाळ्या.
120. आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
121. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
122. आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
123. आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
124. आय नाय त्याला काय नाय.
125. आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
126. आयत्या बिळात नागोबा.
127. आराम हराम आहे.
128. आरोग्य हीच संपत्ती.
129. आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
130. आला भेटीला धरला वेठीला.
131. आली अंगावर, घेतली शिंगावर.
132. आली चाळीशी, करा एकादशी.
133. आली सर तर गंगेत भर.
134. आलीया भोगासी असावे सादर.
135. आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
136. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
137. आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
138. आळश्याला दुप्पट काम.
139. आळी ना वळी सोनाराची आळी.
140. आळ्श्याला गंगा दूर.
141. नावडतीचे मीठ आळणी.
142. आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
143. आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
144. आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
145. आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा.
146. आशा सुटेना अन देव भेटेना.
147. आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
148. ओ म्हणता ठो येईना.
149. ओठात एक आणि पोटात एक.
150. ओठी ते पोटी.
151. ओल्या बरोबर सुके जळते.
152. ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
153. ओळखीचा चोर जीवे मारी.
154. ओसाड गावी एरंडी बळी.
155. औटघटकेचे राज्य.
156. औषधावाचून खोकला गेला
157. कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
158. कच्च्या गुरुचा चेला.
159. कठीण समय येता कोण कामास येतो.
160. कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.
161. कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
162. कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
163. कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
164. कपिलाषष्टीचा योग.
165. कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला.
166. कर नाही त्याला ड़र कशाला?
167. करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का?
168. करणी कसायची, बोलणी मालभावची.
169. करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती.
170. करवंदीच्या जाळीला काटे.
171. करायला गेलो एक अऩ झाले एक.(भलतेच).
172. करावे तसे भरावे.
173. करीन ती पूर्व.
174. करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले.
175. करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
176. करू गेले काय? अन उलटे झाले काय?
177. कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड.
178. कळते पण वळत नाही.
179. कशात काय अन फाटक्यात पाय.
180. कशात ना मशात, माकड तमाशात.
181. कष्ट करणार त्याला देव देणार.
182. का ग बाई उभी, घरात दोघी तिघी.
183. काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
184. काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
185. काखेत कळसा अऩ गावाला वळसा.
186. काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
187. काट्याचा नायटा होतो.
188. काट्याने काटा काढायचा.
189. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
190. काडी चोर तो माडी चोर.
191. कानात बुगडी, गावात फुगडी.
192. काप गेले नि भोका रवली(भोके राहिली).
193. काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही.
194. काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.
195. काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच.
196. काम नाही घरी सांडून भरी.
197. काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
198. कामाचा ना धामाचा भाकरी खातो नेमाचा.
199. कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी.
200. काय करु अऩ कस करु?
201. काय बाई अशी तु शिकवले तशी.
202. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
203. काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.
204. कावळा गेला उडून गू खा चाटून.
205. कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
206. कावळा बसायला आणि फांदी तुटायला.
207. कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे).
208. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
209. कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही.
210. कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
211. काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली.
212. कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
213. कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.
214. कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी.
215. कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
216. कुठे तरी पाल चुकचुकतेय.
217. कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
218. कुडास कान ठेवी ध्यान.
219. कुडी तशी पुडी.
220. कुणाचा कुणाला पायपूस नाही.
221. कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.
222. कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे.
223. कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा.
224. कुत्र्या मांजराचे वैर.
225. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
226. कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ.
227. कुसंतनापेक्षा निसंतान बरे.
228. केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.
229. केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे.
230. केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
231. केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
232. केळ्याचा डोंगर, देई पैशाचा डोंगर.
233. केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
234. कोंड्याचा मांडा करुन खाणे.
235. कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
236. कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं. (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे.)
237. कोल्हा काकडीला राजी.
238. कोल्ह्यास द्राक्षे आंबट.
239. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
240. क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे.
241. खतास महाखत.
242. खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं.
243. खऱ्याला मरण नाही.
244. खाई त्याला खवखवे.
245. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
246. खाऊ जाणे तो पचवू जाणे.
247. खाऊन माजावे पण टाकून माजू नये.
248. खाजवुन अवधान आणणे.
249. खाजवुन खरुज काढणे.
250. खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी.
251. खाण तशी माती.
252. खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
253. खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही.
254. खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले.
255. खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे.
256. खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत.
257. खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ.
258. खायची बोंब अन हगायचा तरफडा.
259. खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे.
260. खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी.
261. खायला कहर आणि भुईला भार.
262. खायला कोंडा अऩ निजायला धोंडा.
263. खायला बैल, कामाला सैल. (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त).
264. खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे.
265. खालल्या घरचे वासे मोजणारा.
266. खाली मुंडी, पाताळ धुंडी.
267. खाल्ल्याघरचे वासे मोजणारा.
268. खावून खग्रास हागुन सत्यानाश.
269. खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
270. खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा.
271. खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.
272. खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा.
273. खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली.
274. खोट्याच्या कपाळी गोटा.
275. "ग" ची बाधा झाली.
276. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
277. गंगेत घोडं न्हालं.
278. गरज सरो अऩ वैद्य मरो.
279. गरजवंताला अक्कल नसते.
280. गरजेल तो पडेल काय?
281. गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.
282. गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं.
283. गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी.
284. गळ्यातले तुटले ओटीत पडले.
285. गवयाचे मुल सुरांनीच रडणार.
286. गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे.
287. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
288. गाठ पडली ठकाठका.
289. गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो.
290. गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं.)
291. गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.
292. गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ.
293. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.
294. गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी.
295. गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य.
296. गाढवाला गुळाची चवं काय?
297. गाता गळा, शिंपता मळा.
298. गावंढ्या गावात गाढवी सवाशीण.
299. गाव करी ते राव न करी.
300. गाव करील ते राव करील काय?
301. गाव तिथे उकिरडा.
302. गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
303. गावात घर नाही रानात शेत नाही.
304. गुप्तदान महापुण्य.
305. गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
306. गुरुची विद्या, गुरुलाच फळली.
307. गुलाबाचे कांटे जसे आईचे धपाटे.
308. गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?
309. गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य.
310. गुळाला मुंगळे चिकटतातच.
311. गोगल गाय पोटात पाय.
312. गोड बोलून गळा कापणे.
313. गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.
314. गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.
315. गोष्ट लहान, सांगण महान.
316. गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.
317. गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
318. घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.
319. घटाकभर नाही माप अन रात्री येई हिवताप.
320. घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.
321. घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी.
322. घर ना दार चावडी बिऱ्हाड. (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड.)
323. घर फिरले की वासेही फिरतात.
324. घर साकड नि बाईल भाकड.
325. घरचा उंबरठा दारालाच माहीत.
326. घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.
327. घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.
328. घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.
329. घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
330. घराची कळा अंगण सांगते.
331. घरात घरघर चर्चा गावभर.
332. घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.
333. घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.
334. घरात नाही कौल, रिकामा डौल.
335. घरात नाही तुरी भट भटणीला मारी.
336. घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
337. घरासारखा गुण, सासू तशी सून.
338. घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.
339. घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी.
340. घरोघरी मातीच्या चुली.
341. घाईत घाई अन म्हातारीला न्हाणं येई.
342. घाण्याचा बैल.
343. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.
344. घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.
345. घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.
346. घे सुरी आणि घाल उरी.
347. घेणे न देणे, कंदिल लावून जाणे.
348. घोंगड अडकलं.
349. घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.
350. घोडामैदान जवळ असणे.
351. घोडे खाई भाडे.
352. घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
353. चढेल तो पडेल.
354. चने खाईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे.
355. चमडी जाईल पण दमडी जाणार नाही.
356. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
357. चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
358. चांदणे चोराला, उन घुबडाला.
359. चांभाराची नजर जोड्यावर.
360. चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा.
361. चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला.
362. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
363. चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती.
364. चालत्या गाडीला खीळ घालणे.
365. चिंती परा ते येई घरा.
366. चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.
367. चिपट्यात काय काय करू?
368. चुकलेला फकीर मशिदीत.
369. चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.
370. चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
371. चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना.
372. चोपदार तुपाशी, राजा उपाशी.
373. चोर तो चोर वर शिरजोर.
374. चोर नाही तर चोराची लंगोटी.
375. चोर सोडून संन्याशाला सुळी.
376. चोराच्या उलट्या बोंबा.
377. चोराच्या मनांत चांदणं.
378. चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
379. चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.
380. चोराला सुटका, आणि गावाला फटका.
381. चोरावर मोर.
382. चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
383. चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची.
384. चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते.
385. छडी लागे छमछम विद्या येई घमघम.
386. जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
387. जगाच्या कल्याणा संताची विभुती.
388. जनाची नाही तरी मनाची तरी जरा.
389. जनात बुवा आणि मनात कावा.
390. जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
391. जमता दशमा ग्रह.
392. जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
393. जलात राहून माशाशी वैर कशाला?
394. जळतं घर भाड्याने कोण घेणार?
395. जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.
396. जशास तसे.
397. जशी कामना तशी भावना.
398. जशी देणावळ तशी धुणावळ.
399. जशी नियत तशी बरकत.
400. जसा गुरु तसा चेला.
401. जसा भाव तसा देव.
402. जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
403. जातीसाठी खावी माती.
404. जात्यातले रडतात, सुपातले हसतात.
405. जात्यावर बसले की ओवी सुचते.
406. जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
407. जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
408. जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
409. जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
410. जावयाचं पोर हरामखोर.
411. जावा जावा आणि उभा दावा.
412. जावा जावा हेवा देवा.
413. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
414. जिकडे सुई तिकडे दोरा.
415. जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
416. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
417. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.
418. जिथे कमी तिथे आम्ही.
419. जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
420. जुनं ते सोनं नवं ते हवं.
421. जे न देखे रवि ते देखे कवि.
422. जे पिंडी ते ब्रम्हांडी.
423. जे फुकट ते पौष्टीक.
424. जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
425. जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
426. जो गुण बाळा तो जन्म काळा.
427. जो नाक धरी, तो पाद करी.
428. जो श्रमी त्याला काय कमी.
429. जोकून खाणार, कुंथुन हागणार.
430. जोवरी पैसा तोवरी बैसा.
431. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
432. ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
433. ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
434. ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
435. ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
436. ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
437. ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी.
438. ज्याची दळ त्याचे बळ.
439. ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप.
440. ज्याच्या हाती ससा तो पारधी.
441. ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
442. ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
443. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
444. ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा.
445. ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
446. टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही.
447. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
448. टिटवेदेखील समुद्र आटविते.
449. ठकास महाठक.
450. ठण ठण पाळ मदन गोपाळ.
451. ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला.
452. ठेवले अनंते तैसेची रहावे.
453. ठोसास ठोसा.
454. डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा.
455. डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
456. डोंगर पोखरून उंदीर काढणे.
457. डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव.
458. डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते.
459. डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू.
460. ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.
461. ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.
462. ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.
463. ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.
464. ढोंग धतोरा, हाती कटोरा.
465. ढोरात ढोर, पोरात पोर.
466. त वरून ताकभात.
467. तण खाई धन.
468. तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.
469. तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
470. तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे.
471. तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
472. तळहाताने चंद्र झाकत नाही.
473. तळे राखी तो पाणी चाखी.
474. तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
475. तहान लागल्यावर आड खणणे.
476. ताकातल्या तुपासारखे, सौंदर्य.
477. ताकापुरते रामायण.
478. ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
479. तागास तूर लागू न देणे.
480. ताटाखालचं मांजर.
481. ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच.
482. तारेवरची कसरत.
483. ती नाही घरी नी गमजा करी.
484. तीन तिघडा काम बिघाडा.
485. तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
486. तुकाराम बुवांची मेख.
487. तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.
488. तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही.
489. तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
490. तुरात दान, महापुण्य.
491. तुला नं मला, घाल कुत्र्याला.
492. तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
493. तेरड्याचे रंग तीन दिवस.
494. तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
495. तेलणीवर रुसली अंधारात बसली.
496. तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
497. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
498. तोंडात तीळ भिजत नाही.
499. तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
500. त्यात काही राम नाही.
501. थांबला तो संपला.
502. थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
503. थेंबे थेंबे तळे साचे.
504. थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे.
505. थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.
506. थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.
507. दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
508. दगडापेक्षा विट मऊ.
509. दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
510. दहा गेले पाच उरले.
511. दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
512. दही वाळत घालून भांडण.
513. दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
514. दांत कोरून पोट भरतो.
515. दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
516. दानवाच्या घरी रावण देव.
517. दाम करी काम.
518. दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
519. दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
520. दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
521. दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
522. दिवस बुडाला मजूर उडाला.
523. दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं.
524. दिवसा चुल रात्री मूल.
525. दिवाळी दसरा हात पाय पसरा.
526. दिव्याखाली नेहमीच अंधार.
527. दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
528. दुःख रेड्याला न डाग पखालीला.
529. दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
530. दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे.
531. दुधात साखर आणि आंघोळीत लघवी.
532. दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
533. दुभत्या गाईच्या लाथा गोड.
534. दुरून डोंगर साजरे.
535. दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
536. दुष्काळात तेरावा महिना.
537. दुसऱ्या वरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
538. दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी.
539. दृष्टी आड सृष्टी.
540. दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
541. दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!
542. दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.)
543. देखल्या देवा दंडवत.
544. देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
545. देण कुसळाच, करणं मुसळाच.
546. देणाऱ्याचे हात हजार.
547. देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
548. देणे ना घेणे रिकामे गाणे.
549. देव तारी त्याला कोण मारी.
550. देव भावाचा भुकेला.
551. देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला.
552. देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
553. देवाची करणी आणि नारळात पाणी.
554. देश तसा वेश.
555. देह देवळात चित्त पायतणात.
556. दैव देतं अऩ कर्म नेतं.
557. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
558. दोघींचा दादला उपाशी.
559. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
560. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
561. द्या दान सुटे गिरान (ग्रहण).
562. धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.
563. धनवंताला दंडवत.
564. धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा.(धन्याला कन्या अनं चोराला मलिदा.)
565. धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक.
566. धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.
567. धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.
568. धाक ना दरारा, फुटका नगारा.
569. धावत्यापाठी यश.
570. धावल्याने धन मिळत नाही.
571. धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे. (वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.)
572. धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा.
573. धुतल्या तांदळातला खडा.
574. न कर्त्याचा वार शनिवार.
575. न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.
576. न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
577. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.
578. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
579. नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.
580. नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
581. नमनाला घडाभर तेल.
582. नरो वा कुंजारोवा.
583. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
584. नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.
585. नवरा नाही घरी सासरा जांच करी.
586. नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.
587. नवा कावळा शेण खायला शिकला.
588. नव्याची नवलाई.
589. नव्याचे नऊ दिवस.
590. नसुन खोळंबा असुन दाटी.
591. ना घरचा ना घाटचा.
592. नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
593. नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
594. नांव गंगुबाई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबाई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबाई, रांजनात पाणी नाही).
595. नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
596. नांव मोठे लक्षण खोटे.
597. नांव सगुणी करणी अवगुणी.
598. नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
599. नांव सोनुबाई अन हाथी कथिलाचा वाळा.
600. नाक दाबले की तोंड उघडते.
601. नाकपेक्षा मोती जड.
602. नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा
603. नाकावर पदर अन विशीवर नजर.
604. नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
605. नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
606. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक येईना म्हणे ओली लाकडे.
607. नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
608. नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण.
609. नारो शंकराची घंटा.
610. नालासाठी घोडं.
611. नाव सोनुबाई हाथी कथिलाचा वाळा.
612. नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.
613. नाही चिरा, नाही पणती.
614. नाही निर्मल मन काय करील साबण.
615. निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
616. नेमेचि येतो मग पावसाळा.
617. नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
618. न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.
619. पंचमुखी परमेश्वर.
620. पंत मेले, राव चढलॆ.
621. पडतील स्वाती तर पिकतील मोती.
622. पडत्या फळाची आज्ञा.
623. पडलो तरी नाक वर.
624. पडू आजारी, मौज वाटे भारी.
625. पत्रावळी आधी दोणा, तो जावई शहाणा.
626. पदरी पडले आणि पवित्र झाले.
627. परदु:ख शितल असते.
628. पराचा कावळा करणे.
629. पळत भुई थोडी.
630. पहिला दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पयी, तिसऱ्या दिवशी थारी अक्कल आधी गयी.
631. पहिले पाठे पंच्चावन्न.
632. पाचावर धारण बसली.
633. पाटलाचं घोडं महाराला भुषण.
634. पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.
635. पाण्यात म्हैस वर मोल.
636. पाण्यात राहून माशाशी वैर?
637. पाण्यावाचून मासा झोपा घेई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
638. पादऱ्याला पावटाचे निमित्त. (पादऱ्याला पावट्याच आधार.)
639. पादा पण नांदा.
640. पानामागून आली अन तिखट झाली. (अगसली ती मागासली, मागाहून आली ती गरोदर राहीली.)
641. पाप्याचं पितर आणि वर आला जवर.
642. पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे?
643. पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम.
644. पायाखालची वाळू सरकली.
645. पायातली वाहन पायात.
646. पारध्याच गोड गाणं, हरिणीसाठी जेवघेणं.
647. पारावरला मुंजा.
648. पालथ्या घडावर पाणी. (पालथ्या घागरीवर पाणी.)
649. पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका मुले मारती खडे.
650. पिंपळाला पाने चार.
651. पिकतं तिथे विकत नाही.
652. पिकले पान केव्हातरी गळून पडणारच.
653. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.
654. पितळ उघडे पडले.
655. पी हळद अऩ हो गोरी.
656. पुढच्याच ठेच मागचा शहाणा.
657. पुत्र व्हावा ऎसा गुंडा ज्याचा तिन्ही लौकी झेंडा.
658. पुराणातील वानगी पुराणात.
659. पुरुषांचे मरण शेती, बायकाचे मरण वेतीं (प्रसुती).
660. पेरावे तसे उगवते.
661. पैशाकडेच पैसा जातो.
662. पोकळ वाशांचा आवाज मोठा.
663. पोट भरे खोटे चाले.
664. पोटात नाही दाणा म्हणे रामकृष्ण म्हणा.
665. प्रयत्नांती परमेश्वर.
666. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.
667. फुकट घालाल जेवू तर सारेजन येवू, काही लागेल देणं तर नाही बा येणं.
668. फुकटचंबू बाबूराव.
669. फुकटचे खाणे आणि हागवणीला कहर.
670. फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
671. बड़ा घर पोकळ वासा.
672. बळी तो कान पिळी.
673. बाई ही काही काळाची पत्नी असते पण अनंत काळाची माता असते.
674. बाईचा मात्र हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द.
675. बाईल गेलीया अऩ झोपा केला.
676. बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
677. बाज बघुन बाळंतीण व्हावे.
678. बाजारात नाही तुरी भट भटणीला मारी.
679. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.
680. बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
681. बापा परी बाप गेला बोंबलताना हात गेला.
682. बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
683. बायको नाही घरी धोपाटणे उड्या मारी.
684. बारा गावच्या बारा बाभळी.
685. बारा घरचा मुंजा उपाशी.
686. बारा झाली लुगडी तरी भागुबाई उघडी. (बारा लुगडी तरी बाई उघडी.)
687. बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.
688. बुडत्याचे पाय खोलात.
689. बुडत्याला काडीचा आधार.
690. बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती.
691. बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
692. बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या.
693. बोलणाऱ्याचे उडीद सुध्दा विकले जातात पण न बोलणाऱ्याचे गहू पडुन राहतात.
694. बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
695. बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
696. बोले तैंसा चाले त्याची वंदावी पाऊले.
697. बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?
698. भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
699. भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
700. भरवश्याच्या म्हशीला टोणगा.
701. भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?
702. भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.
703. भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत.
704. भातापेक्षा वरण जास्त.
705. भाराबर चिंद्या, शेळीचे शेपुट.
706. भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते.
707. भिंतीला कान असतात.
708. भिक नको पण कुत्रा आवर.
709. भिकेत कावळा हागला.
710. भितीवर डोकं आपटून काही होत नाही उलट स्वत:लाच खोक पडते.
711. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
712. भुकेच्या तापे करवंदीची कापे.
713. भुकेपेक्षा ब्रम बरा.
714. भुकेला केळं, उपासाला सिताफळ.
715. भुकेला कोंडा अन निजेला धोंडा.
716. भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?
717. भुरक्यावाचून जेवण नाही अन मुरक्यावाचून बाई नाही.
718. भुरि आणी दहा गुण चोरी.
719. भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी.
720. मऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये.
721. मड्याच्या टाळुवरचे लोणी खाणारा.
722. मनी चिंती ते वैरीही न चिंती.
723. मनी नाही भाव देवा मला पाव.
724. मनी वसे ते स्वप्नी दिसे.
725. मरावे परी किर्तिरुपे उरावे.
726. मला नं तुला, घाल कुत्र्याला.
727. मला पहा अन फुलं वहा.
728. महादेवापुढे नंदी असायचाच.
729. मांजर डोळे मिटून दुध पिते पण ते जगाला दिसतचं.
730. माकड म्हणतं माझीच लाल.
731. माकडाच्या हातात कोलीथ.
732. माझा लोक तुझ्या घरी अन तुपानं तोंड भरी.
733. माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा?
734. माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
735. मातीचे कुल्ले वाळले की पडायचेच.
736. मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी.
737. माय मरो पण मावशी उरो.
738. मारा पण तारा.
739. मालकाचे हाल शेजारचा तांबडा पाल.
740. माळावर बोंबलायला पाटलाला काय विचारायचं?
741. मिंया बिबी, तेगार भिंतीला उभी.
742. मिया मुठभर, दाढी हातभर.
743. मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
744. मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन.
745. मी हसते लोकांना अनं शेबुड माझा नाकाला.
746. मुंगी व्यायली, शींगी झाली, दुध तिचे किती, बारा रांजण भरून गेले, सतरा हत्ती पिउन गेले.
747. मुंगी हत्तीच्या ढुंगणाला चावू शकते पण हत्ती मुंगीच्या नाही.
748. मुंगेच्या मुताला महापूर.
749. मुग गिळून गप्प बसावे.
750. मुठभर घुगऱ्या अन सारीरात मचंमचं.
751. मुर्ती लहान पण किर्ती महान.
752. मुळांपोटी केरसुनी.
753. मुशा पाहून मुशारा घोडा पाहून खरारा.
754. मेलेलं कोंबडं आगीला भित नाही.
755. मेल्या म्हशीला मणभर (शेरभर) दूध.
756. मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
757. मोडेन पण वाकणार नाही.
758. मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया.
759. मोह सुटेना अऩ देव भेटेना.
760. म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
761. म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
762. म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवाईला नव्हता नवरा.
763. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.
764. याची देहा, याची डोळा.
765. याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
766. ये ग साळू दोघं लोळू.
767. येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
768. येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
769. येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
770. रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
771. रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
772. रंगाने गोरी हजार गुण चोरी.
773. रंग गोरापान आणि घरात गु घान.
774. राईचा पर्वत.
775. राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
776. राजा तशी प्रजा.
777. राजा बोले अऩ दल चाले.
778. राजाला दिवाळी काय ठाऊक?
779. रात्र थोडी अऩ सोंग फार.
780. रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
781. रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
782. रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
783. रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
784. रोज मरे त्याला कोण रडे.
785. लंगडं लागलं कामाला आन चौघं तंगडं धरायला.
786. लंकेत सोन्याच्या विटा.
787. लकडी शिवाय मकडी वळत नाही.
788. लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
789. लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
790. लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
791. लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
792. लहान तोंडी मोठा घास.
793. लांड्यामागे पुंडा.
794. लाखाचे बारा हजार.
795. लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
796. लाडावली गुरंविन देवळात हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे.
797. लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
798. लाल केला मागील पाठ विसरून गेला.
799. लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
800. लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
801. लेकी बोले सुने लागे.
802. लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
803. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
804. लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
805. वड्याचे तेल वांग्यावर.
806. वर झगझग आत भगभग.
807. वर मुकुट आणि खाली नागडं.
808. वराती मागून घोडे.
809. वरुन दिसे सोज्वळ आतून सावळा गोंधळ.
810. वरून कीर्तन आतून तमाशा.
811. वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
812. वळले तर सूत नाही तर भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
813. वळवाचा पाऊस.
814. वळू ऊठला पण संशय फिटला.
815. वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
816. वाचेल तो वाचेल.
817. वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
818. वाटाण्याच्या अक्षता.
819. वासरात लंगडी गाय शहाणी.
820. वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
821. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
822. विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
823. विनाशकाले विपरीत बुध्दी.
824. विल्याभोपळाचे साक्ष.
825. विषाची परीक्षा.
826. विहीणाचा पापड वाकडा.
827. वीतभर गजरा गावभर नजरा.
828. वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
829. वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
830. वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
831. वैरी गेला अन जागा पैस झाला.
832. शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.
833. शहाणं होईना अन सांगता येईना.
834. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
835. शहाण्याला शब्दाचा मार.
836. शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
837. शितावरून भाताची परीक्षा.
838. शिर सलामत तर पगड़ी पचास.
839. शिराळ शेती दाट.
840. शिळ्या कढीला ऊत.
841. शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.
842. शेणं आपण खायचं अनू तोंड दुसऱ्याचं हुंगायचं.
843. शेरास सव्वाशेर.
844. शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?
845. शेळीचे शेपुट न माशा हाकालणारे न अब्रु झाकनारे.
846. शोधा म्हणजे सापडेल.
847. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.
848. सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.
849. सगळं मुसळ केरात.
850. सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
851. सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
852. सदाला चोळी आणि वऱ्हाडाला पोतेरी.
853. सरड्याची धांव कुंपणापर्यंत अन मुल्लाची मशिदीपर्यंत.
854. सळो की पळो केले.
855. सवळं दाट अन महारवाड्यातून वाट.
856. ससा उठला आणि कुत्रे हागायला बसले.
857. साखरेचे खाणार द्याला देव देणार.
858. साठी बुध्दी नाठी.
859. साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.
860. सात सुगरणी, भाजी अळणी.
861. साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
862. साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत नऊ नऊ हात.
863. साधली तर शिकार नाही तर भिकार.
864. साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.
865. साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो!
866. साप मुंगसाचे वैर.
867. साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.
868. सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.
869. सासू तशी सून आणि उंबऱ्या तुझा गुण.
870. सासू न सासरा जांच करे तिसरा.
871. सासू नाही घरी, नणंद जाच करी.
872. सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
873. सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
874. सासू सांगे सुनेला आणि आपण जाई गोल्या पाठून.
875. सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
876. साहेबंनी रेड्याचे दुध काढले तर तो चरवी कुठे आहे म्हणून विचारतो.
877. सुंठेवाचून खोकला गेला.
878. सुईण आहे, तो पर्यंत बाळंत होऊन घ्यावे.
879. सुख राई एवढे दु:ख पर्वता एवढे.
880. सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते.
881. सुतावरून स्वर्ग गाठायचा.
882. सुसरबाई, तुझी पाठ मऊ.
883. सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा.
884. सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची.
885. सोन्याहून पिवळे.
886. सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये.
887. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
888. स्वत:ची सावली विकून खाणारी माणसं.
889. स्वभावाला औषध नाही.
890. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
891. हगत्या लाज की बघत्या लाज?
892. हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.
893. हजीर तो वजीर.
894. हत्ती गेला अऩ शेपुट राहिले.
895. हत्ती पोसवतो पण लेक नाही पोसवत.
896. हत्तीवर अंबारी जाते कुत्री भुंकत राहतात.
897. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
898. हसणाऱ्याचे दांत दिसतात.
899. हा सुर्य अऩ हा जयद्रथ.
900. हागणाऱ्याला लाज नाही पण भागणाऱ्याला आहे.
901. हात दाखवून अवलक्षण.
902. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
903. हातचं (गणित) ठेवून वागावे.
904. हातचे सोडून पळत्याच्या मागे.
905. हातच्या काकणाला आरसा कशाला?
906. हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात.
907. हातात कवडी विद्या दवडी.
908. हातानं होईना काही तोंड घेतं घाई.
909. हाती घ्याल ते तडीस न्या.
910. हाती नाही अडका, बाजारात धडका.
911. हाती नाही आणा, मला कारभारी म्हणा.
912. हिंग गेला, वास राहीला.
913. ही काळ्या दगडावरची रेघ.
914. हे बालाजी, छप्पन्न कोटींचा चतुर्थांश.
915. हेंदरं ते हेंदरं आणि गावंदरीला चरायला चाललयं.
916. होता जिवा म्हणून वाचला शिवा.
917. होळी जळाली, थंडी पळाली.
918. हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती.
919. ज्ञान सांगे लोका शेंबुड आपल्या नाका.
920. ’श्री’ आला की ’ग’ सुध्दा येतो.
ब्लॉग खूप आवडला
ReplyDeleteमराठी म्हणी रत्नांच्या खाणी
ब्लॉग विषयी कार्यशाळा घ्याल का?
प्रा.प्रल्हाद भोपे,परभणी 9922794164
Khup ch chan mam..great
ReplyDeleteअबब! किती या म्हणी! मराठी भाषा किती समृद्ध आहे हे पाहण्यासाठी सर्वांनी जरूर या ब्लॉग ला भेट द्यावी. या म्हणींच्या अंगणात मस्त रमलो.
ReplyDelete